हांसत आली निर्मला आई, घालून पैंजण पायी आई
नवरतनाचा मुकुट शिरावर, कंठीशोभे मोतिहार
सुन्दर माझी निर्मला आई, घालून पैंजण पायी आई
जरीपदराचा कसुनी पीताम्बर, चोली ल्याली बूटेदार
सुन्दर माझी निर्मला आई, घालून पैंजण पायी आई
शिव ब्रह्मा विष्णु ही सारे, ध्याती निशदिन मुनिवर सारे
सुन्दर माझी निर्मला आई, घालून पैंजण पायी आई
सहजयोगी आम्ही अशी पाहिली, शरण तिजला सर्वही जाई
सुन्दर माझी निर्मला आई, घालून पैंजण पायी आई
जय श्री माताजी
No comments:
Post a Comment