तुझ्या पूजनी अर्चनी लीन व्हावे
तुझे निर्मला नाम आम्ही स्मरावे
तुझ्या पूजनी अर्चनी लीन व्हावे
तुझ्या दर्शनाला आम्ही रोज यावे, तुझ्या मंदिरी गीत, आम्ही म्हणावे
तुझ्या कीर्तनी रात्री रंगुनी जावे , तुझे निर्मला नाम आम्ही स्मरावे
तुझ्या पूजनी अर्चनी लीन व्हावे
आम्हाला विसावा प्रप्न्चामधे तू, आम्हा पाठीराखी भविष्यमधे तू
तुझ्या चरणाचे आम्ही दास व्हावे, तुझे निर्मला नाम आम्ही स्मरावे
तुझ्या पूजनी अर्चनी लीन व्हावे
तुवा दाविला मुक्तीचा मार्ग आम्हा, तुवा दाविला भक्तीचा स्वर्ग आम्हा
तुझ्या कीर्तीचे गोडवे नित्य गावे, तुझे निर्मला नाम आम्ही स्मरावे
तुझ्या पूजनी अर्चनी लीन व्हावे
जय श्री माताजी
No comments:
Post a Comment